शिंपी समाजातील पोटजातींचे एकत्रीकरण करून ओबीसींची ताकद वाढवावी. त्यामुळे समाजातील समस्या मार्गी लावणे सोपे होईल, असा सल्ला खा. समीर भुजबळ यांनी दिला.
शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने आयोजित शिंपी समाजाचा नववा राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळावा व नाशिक महानगर नामदेव शिंपी जनगणना नामसूची प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयंत जाधव, सिडको प्रभाग सभापती कल्पना पांडे, वैजापूरचे ज्येष्ठ समाजसेवक निळकंठ खांबेकर, काशिनाथ रहाणे, शामसुंदर रहाणे, माजी नगरसेवक संजीव तुपसाखरे, अतुल मानकर आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष तथा समस्त शिंपी समाज प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष नंदलाल काळे यांनी केले. सूत्रसंचालन दर्शना धटिंगण व शोभा कऱ्हाडकर यांनी केले. आभार रत्नाकर लुंगे यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा