शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाने राजीनामा द्यावा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन २० व्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष व्ही. यु. पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांच्या घरासमोर १० जानेवारीपासून कर्मचारी व शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आतापर्यंत मनोहर पाटील, किशोर राजपूत, संजय पटेल आदी १२ संचालकांनी राजीनामे दिले आहेत. उर्वरित संचालक व अध्यक्ष यांचा राजीनामा मिळेपर्यंत ‘पाटील घरी परतल्यावर कामगारांशी संपर्क साधून त्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न करावा’ अशा आशयाचा फलक त्यांच्या घरासमोर लावण्याचे आंदोलकांकडून ठरविण्यात आले. जोपर्यंत पाटील व उर्वरित संचालक राजीनामे देणार नाहीत. तोपर्यंत दिसतील तेथे त्यांना घेराव घालून राजीनामे मागितले जातील. पाटील घरी परतल्यावर त्यांना राजीनाम्यासाठी भाग पाडू. शासन दरबारी संचालक मंडळाची तक्रार करून मंडळ बरखास्त करण्यसााठी प्रयत्न केले जातील. एप्रिल २०१४ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपत आहे. त्यामुळे निवडणूक लवकर घेण्यात यावी, यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविले जातील. यापुढे होणाऱ्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही कामगार संघटनेने केले आहे. यावेळी कारखान्याचे माजी संचालक मनोहर पाटील, प्रसन्न जैन, किरण दलाल, वासुदेव देवरे, बी. एच. पवार आदी उपस्थित होते.
शिरपूर साखर कारखाना कामगारांचे आंदोलन स्थगित
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाने राजीनामा द्यावा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन
First published on: 31-01-2014 at 08:15 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shirpur sugar factory labor movement suspended