सातारा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवरायांची जयंती मोठय़ा उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवरायांच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या निनादानी साता-याचे वातावरण शिवमय झाले होते.
सकाळी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, उपाध्यक्ष अमोल मोहिते तसेच नगरसेवक यांनी शिवप्रेमींच्या उपस्थितीत राजवाडा तसेच पोवईनाका येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहून अभिवादन केले. अजिंक्यतारा तसेच सज्जनगड येथून शिवमंडळांतर्फे शिवज्योती विविध भागात नेण्यात आल्या. गावात चौकाचौकात शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना करून पोवाडे, मर्दानी क्रीडा प्रकाराचे सादरीकरण तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शाही मिरवणूक काढण्यात आली.

Story img Loader