उरण विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विवेक पाटील यांना ८४६ मतांनी पराभूत करीत शिवसेनेचे उमेदवार मनोहर गजानन भोईर विजयी झाले आहेत. भोईर यांच्या विजयात उरण शहरातील महत्त्वाचा वाटा असून  ग्रामीण भागातूनही शिवसेनेला भरघोस मतदान झाले आहे. काँग्रेस तिसऱ्या तर भाजप चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.
सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शेकापला विजयाची खात्री असल्याने शेकाप कार्यकर्त्यांनी लालबावटे घेऊन मतमोजणीच्या परिसरात प्रवेश केला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटकाव केल्याने झेंडे गुंडाळावे लागले. मतमोजणीच्या एकूण १७ फेऱ्यांपर्यंत विवेक पाटील हे आघाडीवर होते.   १८ व्या फेरीनंतर चित्र पालटून शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. २२ व्या फेरीत दोन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतमोजणी थांबविण्यात येऊन अखेरीस बिघाड दुरुस्त झाल्यानंतर शेवटच्या २३ फेरीत शिवसेनेचे मनोहर भोईर यांचा विजय झाल्याचे उरण विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी जाहीर केले. मनोहर भोईर यांना विजयी केल्यानंतर शिवसेनेने एकच विजयोत्सव साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा