तालुक्याच्या ग्रामीण भागातील भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे नाशिकरोड येथील वीज भवनावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चेकऱ्यांतर्फे वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये काही दिवसांपासून भारनियमन करण्यात येत आहे.
भारनियमनामुळे शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी पुरेशी वीज मि़ळत नसल्याने शेतपिकांचे नुकसान होत असल्याने महागाईला तोंड द्यावे लागत असून पाणी देता येत नसल्याने पेरणी वाया जात आहे. सिंगल फेज वीज पुरवठाही सुरळीत केला जात नाही. रात्री ११ नंतरही भारनियमन केले जात असल्याने उकाडय़ाने वयोवृद्ध व बालकांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सिंगल फेज वीजपुरवठा खंडित करू नये, कृषिपंपासाठी पुरेशी वीज द्यावी अशा मागण्या शिवसेनेतर्फे करण्यात आल्या. निवेदन देताना योगेश घोलप, प्रकाश म्हस्के, नितीन चिडे, राजेश फोकणे, हरिभाऊ गायकवाड, संतोष पवार आदी उपस्थित होते.

Story img Loader