चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केट सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. शिवसेनाप्रमुखांची विविध भावमुद्रेतील तब्बल २ हजार २२२ छायाचित्रांचा त्यात समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या दहा हजार स्क्वेअरफूट मांडवातच हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्याच जोडीला ग्रंथप्रदर्शन, ठाकरे यांच्या निवडक भाषणांचे प्रसारण असे उपक्रम मंडळाने आयोजित केल्याचे मंडळाचे अध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख प्रदीप परदेशी यांनी सांगितले. वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड व व्लेर्ड रेकॉर्ड्स इंडिया या दोन संस्थांनी छायाचित्र प्रदर्शनाची दखल घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठय़ा संख्येने भेट द्यावी असे आवाहन परदेशी यांनी केले.   

Story img Loader