बारामती-दादर मार्गावर एसटीची वातानुकूलित शिवनेरी बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी स्वारगेट मार्गाने सोडण्यात आली आहे. बारामती येथून सकाळी साडेसहा वाजता ही बस सोडण्यात येत आहे. मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसर, स्वारगेट, चांदणी चौक, इंदिरा कॉलेज (वाकड), कळंबोली, कोकणभवन, नेरुळ फाटा, वाशी हायवे, मैत्री पार्क, चेंबूर या मार्गाने २५५ किलोमीटरचे अंतर सहा तासात पार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परतीच्या प्रवासात दादरहून दुपारी तीन वाजता ही गाडी सोडण्यात येते. रात्री नऊच्या सुमारास ती बारामती येथे पोहोचते. या गाडीच्या प्रवासासाठी ५९५ रुपये (प्रौढ) व ३०० रुपये (मुले) तिकीट आकारणी करण्यात येत आहे. स्वारगेट ते बारामती या प्रवासाठी २३५ रुपये प्रवासभाडे आहे. या सेवेचे ऑनलाईन आरक्षणही सुरू करण्यात आले आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा