ऐन दिवाळीत अपुरा पाणीपुरवठा केला जात असल्याने आणि कचरा उठाव प्रश्न उग्र बनला असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावेळी सणाच्या काळात शहरवासीयांना अखंडित मूलभूत सुविधा पुरवण्याच्या अशा सूचना करण्यात आल्या.
कोल्हापूर शहराच्या पाणी पुरवठय़ाचे नियोजन फसले आहे. तर, कचरा उठाव होत नसल्याने अस्वच्छतेमुळे सामान्य जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महापालिकेच्या या निष्क्रिय कारभारामुळे ऐन दिवाळी सणात नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेच्या निष्क्रिय कामकाज पध्दतीचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेनेने घंटानाद आंदोलन केले होते.
महापालिकेसमोर जमलेल्या शिवसैनिकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. या घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला. आमदार क्षीरसागर यांनी घंटानाद करीत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. या आंदोलनात शिवसेनेचे नगरसेवक संभाजी जाधव, नगरसेवक महेश कदम, राजू हुंबे, उपशहरप्रमुख रणजित जाधव, जयंवत हारूगले, विभागप्रमुख गजानन भुर्के, युवा सेनेचे रणजित आयरेकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष शुभांगी साळोखे, पूजा भोर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापुरात कचराप्रश्नी शिवसेनेचे आंदोलन
ऐन दिवाळीत अपुरा पाणीपुरवठा केला जात असल्याने आणि कचरा उठाव प्रश्न उग्र बनला असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावेळी सणाच्या काळात शहरवासीयांना अखंडित मूलभूत सुविधा पुरवण्याच्या अशा सूचना करण्यात आल्या.
First published on: 14-11-2012 at 02:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena makes strike aginst garbege problem