हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साप्ताहिक मार्मिक, दैनिक सामनाचे संपादक व महान चित्रकार म्हणून जगभर ख्याती मिळवून राहताना, प्रखर देशभक्त, हिंदुत्ववादी व समाजहितैषी असा त्यांचा अवघ्या हिंदुस्थानवर ठसा होता. हिंदुत्ववादी विचारांनी बहरलेल्या तमाम जनतेचे ते आधारवड होते. त्यांच्या विचारांची हिंदुस्थानच्या खऱ्या स्वराज्यासाठी नितांत गरज असल्याचे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रमोद तोडकर यांनी सांगितले.
येथील जिजामाता चौक, गजानन चौक, नटराज गणेश मंडळ, गजानन नाटय़मंडळ व शशिराज करपे मित्र मंडळातर्फे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन प्रमोद तोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दीपक वसगडेकर, राजू कोरडे, बापू करपे, संदीप वसगडेकर, विलास बेडके, बापू माने, सतीश लोहार, दीपक कोरडे, सागर वसगडेकर नेताजी वसगडेकर आदी शिवसैनिक व हिंदुत्ववादी कार्यकत्रे उपस्थित होते. जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जागवल्या.
दीपक वसगडेकर म्हणाले, की शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या विचारांच्या शिदोरीवर मार्गक्रमण केल्यास हिंदुस्थान अल्पावधीत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. समाजसुधारकांना अभिप्रेत हिंदुस्थान घडविण्याची ताकद केवळ शिवसेनाप्रमुखांच्या विचारातच असल्याचा ठाम विश्वास देताना, शिवसेनेच्या विचारांचा वारसा पुढे कायम ठेवणे हीच बाळासाहेब ठाकरे यांना खऱ्याअर्थाने श्रद्धांजली ठरेल असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा