येथील चित्रनगरीतील चित्रीकरणाची प्रदीर्घ काळची अंगारकी सोमवारी संपुष्टात आली. आयडीएल एन्टरटेन्मेंट प्रस्तुत व अविनाश मोहितेनिर्मित ‘अंगारकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सोमवारी प्रारंभ झाला. अभिनेते मकरंद अनासपुरे व अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यावर मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला.    
गेले अनेक वर्ष कोल्हापूर चित्रनगरीत चित्रपट वा मालिकांचे चित्रीकरण झाले नव्हते. ज्या कोल्हापुरातून भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला तेथीलच चित्रनगरी चित्रीकरणाच्या प्रतीक्षेत होती. सोमवारी येथे चित्रीकरण सुरू झाल्याने चित्रनगरी पुन्हा एकदा झळाळून निघाली. चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर, महापौर प्रतिभा नाईकनवरे, पुण्याच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते, आळंदी देवस्थानचे विश्वस्त प्रा.शिवाजीराव मोहिते उपस्थित होते.     
दरम्यान चित्रनगरीत अंगारकीचे ५ जूनपर्यंत चित्रीकरण पार पडेल. चित्रपटात मुख्य भूमिकेत मकरंद अनासपुरे, तेजस्विनी पंडित, अवतार गिल, गार्गी पटेल, स्वप्नील राजशेखर, शरद पोंक्षे, विलाज उजवणे असे मराठी व हिंदीतील अनेक दिग्गज या चित्रपटात काम करीत आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चंद्रकांत दुधगावकर यांनी सांभाळली असून चित्रपटाचे लेखन संजय पवार यांचे आहे. छायाचित्रण गिरीश उदाळे, कला सतीश बीडकर यांची आहे. अविनाश मोहिते यांची ही पहिलीच निर्मिती आहे. याच चित्रपटात कोल्हापुरातील कलाकार, तंत्रज्ञांचा समावेश आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा