पुस्तक महोत्सव
विल्को पब्लिशिंग हाऊस आणि बारगॅन बुकहट यांच्या संयुक्त विद्यमाने काळा घोडा येथे मॅक्सम्युलर भवनच्या समोर ‘आय. टी. टी. एस. हाऊस’ येथे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक महोत्सवात कला, पाककला, फॅशन, बालसाहित्य अशा विविध विषयांवरची पुस्तके ठेवण्यात आलेली आहेत. या पुस्तकांवर ५० ते ९० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार असून दररोज नवीन पुस्तके या महोत्सवात उपलब्ध होणार आहेत. या महोत्सवाबद्दल अधिक माहितीसाठी २२०४१४२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
व्यवसायाभिमुख प्रशिक्षण वर्ग
नॅशनल टेक्निकल इन्स्टिटय़ूटतर्फे कुर्ला येथील आकाश सिनेमा लेन येथे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गात अल्पशिक्षित आणि बेरोजगार युवकांना अल्पदरात मोबाईल, संगणक, नेटवर्किंग, टीव्ही दुरुस्ती तसेच इलेक्ट्रिशिअन आणि मोटर वाईंडिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९८९२५९४५४४ / २६५०४१९८ या क्रमांकावर संपर्क साधावा.  
मराठा सांस्कृतिक मंडळाचे कविसंमेलन
गोरेगाव येथील मराठा सांस्कृतिक मंडळाच्या ‘कवितांगण’ व्यासपीठातर्फे येत्या ४ नोव्हेंबर रोजी ४९ व्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कविसंमेलनात सहभागी होण्यासाठी आपल्या कविता मराठा सांस्कृतिक मंडळ गोरेगाव, अण्णाभाऊ साठे मैदान, लिंकरोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई ४०० १०४ येथील कार्यालयात संपूर्ण पत्ता आणि दूरध्वनी क्रमांकासह पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी २८७१२१३१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
‘आम्ही सातारकर’चा दसरा मेळावा
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील सातारकरांसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. परळ येथील दामोदर हॉलमध्ये दुपारी तीन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ‘सप्तरंग संस्कृती’चे या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील सातारकरांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या साक्षांकित गुणपत्रिका आपल्या गाव आणि तालुक्याच्या उल्लेखासह १९ ऑक्टोबपर्यंत आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, द्वारा न्यू सातारा पतसंस्था, संभाजीनगर गृहनिर्माण संस्था, बावला मशीदसमोर, ना. म. जोशी मार्ग, करीरोड, मुंबई १२ या कार्यालयात पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी ९९८७१९९००१/ ५६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.  
रांगोळी शिबिराचे आयोजन
महाराष्ट्रात रांगोळी आणि आदिवासी वारली कलेचा प्रसार करणाऱ्या ‘रंगावली’ परिवारातर्फे रांगोळी आणि वारली चित्रकला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरीतील विद्या विकास हायस्कूल येथे रविवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी वारली चित्रकला शिबीर तर रविवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रांगोळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते ५ या वेळेत होणाऱ्या या शिबिरांच्या नावनोंदणीसाठी ९३२२२६०१५८ / २६३१७९७१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.  
मदतीसाठी आवाहन
माहिमच्या सरस्वती विद्या मंदिरात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या श्रीहरी नायडू या विद्यार्थ्यांला रक्ताचा कर्करोग झाला असून त्याच्यावर परळच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उपचाराचा खर्च सुमारे चार लाख रुपये इतका असून त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हा खर्च पेलविण्याइतकी चांगली नाही. श्रीहरी वरील उपचारासाठी त्याच पालक आणि शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापकांकडून दानशूर व्यक्ती आणि संस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मदतीचे धनादेश ‘डीन पी.बी.सी. एफ. केईएम हॉस्पिटल, परळ, मुंबई-१२’ या नावाने काढून त्याच पत्यावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कविसंमेलन
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड जयंती उत्सव समितीच्या वतीने मंगळवारी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. . सूत्रसंचालक-अरुण म्हात्रे असून यात अशोक नायगावकर, प्रज्ञा दया पवार, प्रशांत मोरे, छाया कोरगावकर, शाहीर संभाजी भगत, कविता मोरवणकर सहभागी होणार आहेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर हॉल, माटुंगा लेबर कॅम्प, येथे हे कविसंमेलन होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Short news mumbai
Show comments