व्यक्तिमत्व विकास शिबीर
कल्याण- समर्थ विद्यापीठातर्फे १८ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत महाड येथील शिवथर घळीत दासबोध अभ्यासक्रम, व्यक्तिमत्व विकास, प्राणायम, योग विषयांवर आधारित निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते २८ वयोगटातील व्यक्तींसाठी हे शिबीर खुले आहे. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क – सुहास जावडेकर ९८२०५२८३५५.
संगीत कार्यक्रम
डोंबिवली- भारतीय संगीत विद्यालयाच्या किरण फाटक यांच्यातर्फे रविवार २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता केळकर रोडवरील चित्तपावन ब्राह्मण सभागृहात, नवराग निर्मित गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – फाटक – ९८१९५३१९०४.
ज्योतिष अधिवेशन
ठाणे – ‘नक्षत्राचं देणं’ संस्थेच्या वतीने रविवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ६ यावेळेत मावळी मंडळ, गणेश टॉकीज जवळ, चरई, ठाणे येथे ‘कृष्णमूर्ती पद्धत’ विषयावर ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. वास्तू, रत्न ज्योतिष, कृष्णमूर्ती पद्धत, फोर स्टेप थिअरी, उपासना यांसारख्या विविध विषयांवर तज्ञांतर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ‘नक्षत्राचं देणं’च्या ५० व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन यावेळी केले जाणार आहे. डॉ. सुनील गोंधळेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – डॉ. सुनील गोंधळेकर – ९८१९२४८१७९
‘उत्कर्ष विद्यार्थ्यांचा’
ठाणे – जीवनविद्या मिशन तर्फे अलिकडेच ठाण्यातील कांती विसारिया सभागृहात खास विद्यार्थ्यांसाठी ‘उत्कर्ष विद्यार्थ्यांचा’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभ्यास, सर्वागीण विकास, ध्येयनिश्चिती यांसाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांची मोठय़ाप्रमाणावर उपस्थिती होती.
निबंध स्पर्धेचे आयोजन
ठाणे – ‘सुलोना संस्कृत स्थानम’ संस्थेच्या वतीने रविवार ९ डिसेंबर रोजी येथील सरस्वती सेकंडरी स्कुल येथे गीतापठण आणि गीतेवर आधारित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पठणासाठी गीतेच्या पहिल्या अध्यायातील १ ते २३ किंवा २४ ते ४७ श्लोक तर निबंध स्पर्धेसाठी गीतेतील पंधरावा पुरुषोत्तमयोग अध्याय असा विषय आहे. १५ वर्षांवरील व्यक्तींसाठी ही स्पर्धा खुली आहे. रविवार १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सरस्वती सेकंडरी स्कूलच्या क्रीडासंकुलात या स्पर्धाचा बक्षिस समारंभ होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८२११८७६२० / ९२२३३१७७८४
‘आरोग्यश्री’चे आवाहन
‘आरोग्यश्री-२०१३’ ही दिनदर्शिका लवकरच प्रकाशित होणार असून या दिनदर्शिकेसाठी आरोग्यविषयक लेख पाठविण्याचे आवाहन डॉ. श्रीकांत गोडसे यांनी केले आहे. हे लेख येत्या ३१ ऑक्टोबर्रयत डॉ. श्रीकांत गोडसे, गोडसे बिल्डिंग, महात्मा फुले मार्ग, डोंबिवली (पश्चिम) येथे पाठवायचे आहे.
पाणी साठवण्यासाठी सल्ला केंद्र  
आपापल्या इमारतींमध्ये किंवा ग्रामीण भागात आपल्या शेतांमध्ये पाणी कसे साठवायचे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते परत वापरात कसे आणायचे या विषयावर मोफत सल्लाकेंद्राचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०० ०२२ येथे शनिवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ५.३० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. महापालिकेचे  निवृत्त मुख्य अभियंता सु. ना. पाटणकर आणि जलवर्धिनीचे विश्वस्त उल्हास परांजपे हे या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.
व्यवसायाभिमुख प्रशिक्षण वर्ग
नॅशनल टेक्निकल इन्स्टिटय़ूटतर्फे कुर्ला येथील आकाश सिनेमा लेन येथे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गात अल्पशिक्षित आणि बेरोजगार युवकांना अल्पदरात मोबाईल, संगणक, नेटवर्किंग, टीव्ही दुरुस्ती तसेच इलेक्ट्रिशिअन आणि मोटर वाईंडिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९८९२५९४५४४ / २६५०४१९८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Story img Loader