थेरगाव येथे शॉर्टसर्किटमुळे जखमी झालेल्या पीयूष संतोष वाळुंज (वय-५, रा. ताथवडे) याचे उपचार सुरू असताना सोमवारी  सकाळी निधन झाले. या स्फोटसदृश घटनेत ३५ टक्के जखमी झालेल्या पीयूषने सुमारे दोन महिने मृत्यूशी झुंज दिली. अखेर, त्याने प्राण सोडला. त्यामुळे थेरगावात शोक व तणावाचे वातावरण होते.
थेरगावातील डांगे चौकात १७ ऑगस्टला ही घटना घडली होती. लक्ष्मीतारा मार्केट इमारतीत अरिहंत कलेक्शनमध्ये पीयूष आई-वडिलांसह आला होता. पायऱ्यांवरून पीयूष येत असताना स्फोटासारखा आवाज झाला, त्यात तो जखमी झाला. त्याच्या मांडीला, पोटाला व कमरेला दुखापत झाली होती. सुरुवातीला त्याला चिंचवडच्या खासगी रूग्णालयात नेण्यात आले व नंतर पुण्यात हलवण्यात आले. पीयूषला विजेचा धक्का बसल्याचे डॉक्टरांनी व पोलिसांनी तेव्हा स्पष्ट केले होते. त्यानंतरचे दोन महिने पीयूषवर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्याची झुंज संपली व त्याने प्राण सोडला.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा