महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या वेळी पक्षाचा आदेश पाळला नाही म्हणून भाजपच्या तीन नगरसेवकांना जिल्हा कार्यालयाने कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत.
श्रीकर चौधरी, मनीषा धात्रक, डॉ. शुभा पाध्ये यांना भाजप कोअर कमिटी सदस्यांच्या विचारानंतर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. भाजपने पक्ष सदस्यांना सकाळी अकरा वाजता कार्यालयात उपस्थित राहण्याचा आदेश काढला होता. हा आदेश स्वीकारण्यास या तीन सदस्यांनी टाळाटाळ केली. तसेच निवडणुकीच्या वेळी सभागृहात वेळेत उपस्थित न राहिल्याची कारणे देण्यात आली आहेत.
हेतुपुरस्सर आपणास हा डिवचण्याचा प्रयत्न भाजपच्या जिल्हा नेत्यांनी केल्याने या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या उमेदवारांना मतदान करूनही अशा प्रकारची खेळी करून आपणास अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या नगरसेवकांनी नाराजीच्या सुराचे खुलासे देण्याच्या हालचाली केल्या असल्याचे समजते.
जिल्हाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सांगितले, या तिन्ही नगरसेवकांनी पक्षादेश स्वीकारण्यास टाळाटाळ केली. सभागृहात उशिरा येणे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी वेगळ्या प्रकारच्या हालचाली काही सदस्यांनी केल्याची माहिती पक्षाला मिळाली आहे. त्यामुळे या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. खुलाशानंतर कारवाईचा विचार केला जाईल.
भाजप नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा
महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या वेळी पक्षाचा आदेश पाळला नाही म्हणून भाजपच्या तीन नगरसेवकांना जिल्हा कार्यालयाने कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. श्रीकर चौधरी, मनीषा धात्रक, डॉ. शुभा पाध्ये यांना भाजप कोअर कमिटी सदस्यांच्या विचारानंतर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. भाजपने पक्ष सदस्यांना सकाळी …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-05-2013 at 12:21 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Show cause notice to bjp corporators