सात वेळा नागपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, रामटेकमधून माजी मंत्री मुकुल वासनिक, आम आदमी पक्षाचे रामटेकचे उमेदवार प्रताप गोस्वामी यांच्यासह विदर्भातील विविध राजकीय मतदार संघातील उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हाधिकारी परिसर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दुमदुमून गेला. मुत्तेमवार आणि वासनिक यांनी अर्ज भरण्याच्यावेळी शक्तिप्रदर्शन केले. यामधील काही प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती काँग्रेसच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व, म्हणजे दहाही मतदारसंघात १० एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १७ मार्चपासून सुरुवात झाली असून उद्या शनिवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. सोमवारी अर्जाची छाननी होईल. बुधवारी २४ मार्चला हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून, त्याच दिवशी सायंकाळी सर्व मतदारसंघातील उमेदवारांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार आणि मुकुल वासनिक यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मिरवणुकीने वासनिक आणि मुत्तेमवार जिल्हाधिकारी कार्यालयात आले. कार्यालय परिसरात लोकांना प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे कार्यालयाच्या बाहेर झालेल्या गर्दीमुळे या भागातील वाहतूक काही विस्कळीत झाली होती. ‘वारे पंजा आ गया पंजा’, मुत्तेमवार- वासनिक आगे बढो, जितेगा भाई काँग्रेस जितेगा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार अशोक धवड, अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक, सुनील केदार, नाना गावंडे, सुनीता गावंडे, सुबोध मोहिते, आमदार दीनानाथ पडोळे, माजी शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय पाटील, एकीकृत रिपब्लिकन पक्षाच्या सुलेखा कुंभारे आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गेल्या पाच दिवसांपासून निरस जाणवणाऱ्या या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरला. उमेदवारी अर्जभरण्याच्या निमित्ताने दोघांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आम आदमी पक्षाचे रामटेकचे उमेदवार प्रताप गोस्वामी, उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी, आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरताना मुत्तेमवार, वासनिकांचे शक्तिप्रदर्शन
सात वेळा नागपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, रामटेकमधून माजी मंत्री मुकुल वासनिक, आम आदमी पक्षाचे रामटेकचे उमेदवार
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-03-2014 at 12:21 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Show of strength starts on eve of nomination filing