प्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर फडके यांची ‘सुगम संगीत’ कार्यशाळा १७ व १८ ऑगस्ट रोजी डोंबिवलीत आयोजित करण्यात आली आहे. या दोनदिवसीय कार्यशाळेतून मिळणारा सर्व निधी आदिवासी मुलांच्या उत्कर्षांसाठी कार्य करणाऱ्या पनवेल येथील देहरंग आदिवासी गावातील ‘सत्कर्म श्रद्धाश्रय’ या सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहे.
डोंबिवली ‘एमआयडीसी’तील यश जिमखान्याजवळील ब्रह्मचैतन्य सभागृहात सकाळी १०.०० ते दुपारी १.०० व दुपारी ३.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत महिला, पुरुष, विद्यार्थी, तरुण, तरुणी सहभागी होऊ शकतात. स्वर, ताल, भाव आणि शब्दोच्चार याविषयीचे मार्गदर्शन श्रीधर फडके या कार्यशाळेत करणार आहेत. स्वत: स्वरबद्ध केलेली गाणी बसवून घेणार आहेत. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व होणाऱ्या गायनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे.
डॉ. अभय उपासनी, राजू वडनेरकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. कार्यशाळेसाठी मर्यादित जागा आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर नाव-नोंदणी करण्यात येत आहे. डॉ. उपासनी व सहकारी गेले तीन वर्षांपासून काही सामाजिक संस्थांना कार्यक्रमाच्या माध्यमातून निधी देण्याचे उपक्रम राबवित आहेत. नाव नोंदणीसाठी संपर्क, अमरेंद्र पटवर्धन ९८२१०६५६५१, ऑडिओ मास्टर ९८२०१५००५०, मृदुला दाढे-जोशी ९८२००८१०८०. याशिवाय राहुल एन्टरप्राईसेस, विवेक वडगबाळकर ९८२०८६७४२२, हेरंब म्युझिक, कल्याण गायन समाज येथेही नोंदणी करण्यात येणार आहे.

Story img Loader