शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा राज्यभर धुमाकूळ सुरूच असून काल गंठण चोरी करताना राज पोलाद इराणी तसेच फिरोज सुलतान इराणी या दोघांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे.
औरंगाबाद शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर जाणा-या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढले होते. स्थानिक नागरिकांच्या यासंबंधी तक्रारी वाढून पोलिसांविरोधात कमालीचा असंतोष पसरला होता. त्याची गंभीर दखल घेत हा तपास विशेष गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. विशेष गुन्हे शाखेने काल याप्रकरणी श्रीरामपूर शहर परिसरात राहणारे राज पोलाद इराणी व फिरोज सुलतान इराणी या दोघांना अटक केली आहे.
या दोघांकडून पोलिसांनी मंगळसूत्र चोरीतील एक सोन्याचे गंठण तसेच चार सोन्याचे मंगळसूत्र मिळविले आहे. या दोघांकडून हा ऐवज पोलिसांनी जप्त केला. जप्त केल्याल्या सोन्याचे वजन ६२ ग्रॅम इतके असून त्याची बाजारातील किंमत सुमारे २ लाखापर्यंत आहे. औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा, सातारा, सिडको, मुकुंदवाडी या भागात राज इराणी व फिरोज इराणी यांनी गंठण चो-या केल्याचे उघडकीस आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा