शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई शाखा व प्रतापगड उत्सव समिती आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ व ठोस कायद्यांच्या मागणीसाठी शहरातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
सध्या नवी दिल्ली, मुंबई, नाशिक आदींसह आपल्या आजूबाजूच्या परिसरातही मुली व महिलांवर अत्याचार, विनयभंगासारखे प्रकार घडत आहेत. अशा प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे. प्रसंगी पोलिसांना सहकार्य करत अशा प्रवृत्तींना धडा शिकविणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. गणपती घाटावरून निघून हा मोर्चा किसन वीर चौक मार्गे प्रांत व तहसीलदार कार्यालयावर जाणार आहे. महाविद्यालयीन परिसरात व इतरतरि महिलांची छेडछाड करणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. या वेळी विजयाताई भोसले, राहुल खरात, संदीप जायगुडे, राहुल पवार, संतोष काळे, सागर मालुसरे आदी उपस्थित होते.

Story img Loader