ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (शनिवार) सोनई येथे ‘संकल्प साध्या विवाहाचा’उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता मुळा एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, की यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या चार वर्षांपासून परिसरात सामाजिक उपक्रम राबवण्यात येतो. यापूर्वी नेत्रदान संकल्प, गरीब मुलींचे शैक्षणिक पालकत्व, गाव दत्तक योजना व वृक्षारोपण संकल्प असे उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आले. यंदा ‘संकल्प साध्या विवाहाचा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
उद्या होणा-या कार्यक्रमात चार हजार युवक-युवती सहभागी होणार असून, लग्नसमारंभातील डामडौल बाजूला ठेवून साध्या पद्धतीने विवाह करण्याचा संकल्प हे युवक-युवती करतील. लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्याला सार्वजनिक स्वरूप न देता कौटुंबिक सोहळा अशाच पद्धतीने हा सोहळा व्हावा असा प्रतिष्ठानचा प्रयत्न असून त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून परिसरात जागृती सुरू आहे. युवक-युवतींसह पालकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद लाभला असून याद्वारे समाजात एक चांगला पायंडा पाडण्याचा प्रयत्न आहे असे प्रशांत गडाख यांनी सांगितले. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
सोनईत आज ‘संकल्प साध्या विवाहाचा’
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (शनिवार) सोनई येथे ‘संकल्प साध्या विवाहाचा’उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता मुळा एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.
First published on: 11-05-2013 at 01:02 IST
TOPICSप्रसंग
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simple marriage resolution programme on the occasion of senior leader gadakhs birthday