रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात आलाप संगीत विद्यालयातर्फे संस्थेच्या संचालिका अंजली निसळ संकल्पित व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या संगीत, गायन, वादन नर्तनाच्या कला विश्लेषणावरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निमित्ताने मानसरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांचे ‘संगीत व  मानस शास्त्र’ या विषयावर व्याख्यान झाले. आलाप संगीतच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय-उपशास्त्रीय गायन-वादन अशा स्वरूपाचे सादरीकरण केले. डॉ. सुधीर भावे यांनी संगीत व बालमनोविकास यांचा जवळचा संबंध कसा आहे, यावर विवेचनासह प्रकाश टाकला. गर्भावस्थेपासून सुरू होणारी व संगीत संस्कारामुळे बाळाची होणारी सुदृढ वाढ, ५ ते ६ वर्षांपर्यंत बाळाच्या बुद्धीच्या विकास काळातील संगीत, गायन, वादन यामुळे मिळू शकणारे प्रावीण्य तसेच शारीरिक हालचालीतील चपळता अशा अनेक बाबींवर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Story img Loader