बेस्ट बसमधून प्रवास करीत असताना एका ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराचा झटका आल्याने रविवारी सकाळी मृत्यू झाला. या प्रवाशाला बसमध्ये झटका आल्यानंतर वाहक व चालक यांनी तात्काळ धावपळ करून रुग्णालयात हलविले. परंतु त्याआधीच या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
मुलुंडहून वांद्रे येथे जाणाऱ्या ४२२ क्रमांकाच्या बसमध्ये ही घटना घडली. मुलुंड येथे राहणारे रामसागर सुरेश प्रतापसिंग (६८) हे मुलुंडमध्येच  बसमध्ये चढले. परंतु त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बसचालक आणि वाहक यांनी पोलिसांच्या मदतीने रामसागर यांना तात्काळ मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.   

Story img Loader