आमगाव तालुक्यातील गोंडीटोला (पद्मपूर) येथे कीटकनाशकयुक्त चारा खाल्ल्यामुळे ६ जनावरांचा मृत्यू झाला, तर १५ जनावरांची प्रकृती गंभीर असल्याची बाब पहाटे उघडकीस आली. दरम्यान, सौम्य विषबाधा झालेल्या १५ जनावरांवर उपचार सुरू असून एका जनावराची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासनातर्फे जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
आमगाव तालुक्यातील गोंडीटोला (पद्मपूर) येथील काही नागरिकांनी गावाजवळील कालव्यालगतच्या शेतशिवारात नेहमीप्रमाणे जनावरे चरण्यासाठी सोडली होती. ही जनावरे सायंकाळी नेहमीप्रमाणे घरी परतली. जनावरांच्या मालकांनी आपापल्या जनावरांना चारापाणी केले. मात्र, पहाटे चार वाजता कमलाबाई सोिवदा भलावी या गोठय़ात गेल्या असता दोन बल मृतावस्थेत आढळून आले. बैलांच्या तोंडाला फेस आल्याचे पाहून तिने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे गावकरी घटनास्थळी आले. या गावकऱ्यांनीही आपापल्या गोठय़ातील जनावरे बघितले असता पाच शेतकऱ्यांचे ५ बल व १ गाय दगावल्याचे आदळून आले. दरम्यान, त्यात १ बल दावा तोडून बाहेर पडला व जवळच्या कालव्याच्या खड्डय़ात मरण पावला. सकाळीच या घटनेची माहिती गावात पसरली व घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली. दरम्यान, नागरिकांमध्ये जनावरांबद्दल काळजी व्यक्त केली जात असूत मृत जनावरांच्या मालकांना शासनातर्फे नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच तलाठी आर. एस. ब्राम्हणकर, सरपंच सुंदरबाई पाथोडे, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेंद्र नायडू, तालुका सचिव संजू देशकर, डॉ. वंदना हेडाऊ, डॉ. कातीलाल पटले, डॉ. प्रमोद बोपचे, डॉ. उमेश बावणकर घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा पंचनामा पद्मपूरचे तलाठी ब्राम्हणकर यांनी केला असून घटनेचा अहवाल आमगावचे तहसीलदार एम. टी. वलथरे यांना सादर केला. मृत जनावरांमध्ये कमला सोिवदा भलावी यांचा ४० हजार रुपये किंमतीचा एक बल, जीवन राजाराम गेडाम यांची १५ हजार रुपये किमतीची १ गाय, घनश्याम तुळशीराम भलावी यांचा २० हजार रुपये किमतीचा १ बल, राधेश्याम शीतल भलावी यांचा २० हजार रुपये किमतीचा १ बल, मोहन राजाराम गेडाम यांचा २० हजार रुपये किमतीचा १ बल असून एकूण १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या जनावरांचा मृत्यू झाला, तर १५ जनावरांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाम्हणी येथील झनकलाल नागरीकर यांनी आपल्या शेतालगतच्या गवतावर कीटकनाशक फवारले आहे. याची सौम्य विषबाधा होऊन जनावरे दगावली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी झनकलाल नागरीकर बाम्हणी यांच्याविरोधात आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जांभूळकर करीत आहेत.
विषारी चारा खाल्ल्याने ६ जनावरांचा मृत्यू
आमगाव तालुक्यातील गोंडीटोला (पद्मपूर) येथे कीटकनाशकयुक्त चारा खाल्ल्यामुळे ६ जनावरांचा मृत्यू झाला, तर १५ जनावरांची प्रकृती गंभीर असल्याची बाब पहाटे उघडकीस आली. दरम्यान, सौम्य विषबाधा झालेल्या १५ जनावरांवर उपचार सुरू असून एका जनावराची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेने परिसरात भीतीचे
First published on: 08-05-2013 at 02:09 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six animal died because takeing the posion food