मद्याने मदमस्त होऊन हॉटेलात धिंगाणा घालणाऱ्या हॉटेल मालकासह सहा नायजेरियन नागरिकांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल विनापरवाना सुरू असल्याचे या कारवाईत समोर आले. पोलिसांनी हॉटेलमधील २६ हजार ३९० रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे.
जुहूगाव सेक्टर ११ येथील वॉजोदियी किचन हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये गोंधळ सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी वाशी पोलिसांकडे केली. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलवर धाड मारली. या ठिकाणी झिंगलेल्या नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रॅफली अॅनेकी (४६) याच्या मालकीचे हे हॉटेल आहे. हॉटेल विनापरवाना सुरू होते. या प्रकरणी हॉटेलचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली असून मद्यसाठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे यांनी दिली आहे.
मद्यधुंद सहा नायजेरियन अटकेत
मद्याने मदमस्त होऊन हॉटेलात धिंगाणा घालणाऱ्या हॉटेल मालकासह सहा नायजेरियन नागरिकांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 08-04-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six drunk nigerian people in arrest