मद्याने मदमस्त होऊन हॉटेलात धिंगाणा घालणाऱ्या हॉटेल मालकासह सहा नायजेरियन नागरिकांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल विनापरवाना सुरू असल्याचे या कारवाईत समोर आले. पोलिसांनी हॉटेलमधील २६ हजार ३९० रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे.
जुहूगाव सेक्टर ११ येथील वॉजोदियी किचन हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये गोंधळ सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी वाशी पोलिसांकडे केली. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलवर धाड मारली. या ठिकाणी झिंगलेल्या नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रॅफली अ‍ॅनेकी (४६) याच्या मालकीचे हे हॉटेल आहे. हॉटेल विनापरवाना सुरू होते. या प्रकरणी हॉटेलचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली असून मद्यसाठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा