जिल्ह्य़ात २४ ते २८ जानेवारी दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे २ हजार ६८२ हेक्टर जमिनीवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. अहवाल प्राप्त होताच शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्याची माहिती आमदार राजीव सातव यांनी दिली.
जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, उपजिल्हाधिकारी रवींद्र पवार यांनी बुधवारी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा भाटेगाव, वरुड आदी गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.
हिंगोली, औंढा, सेनगाव तालुक्यांतील पीक नुकसानीची पाहणी महसूल-कृषी अधिकाऱ्यांनी पूर्ण करून गुरुवारी जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला.
कळमनुरी तालुक्यातील ८५० हेक्टर, तर औंढा नागनाथ तालुक्यात ७५ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
हिंगोली तालुक्यातील ५५० हेक्टर जमिनीवरील नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सादर केला.

Story img Loader