केंद्र सरकारच्या एकात्मिक शहर व झोपडपट्टी विकास योजनेतून (आयएचएसडीपी) ४८० घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. निर्धारित वेळेत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौर शीला शिंदे यांनी दिल्या.
नालेगाव येथे दोन एकर जागेवर २५२ आणि संजयनगर (मोरचूदनगर) येथे पावणेदोन एकर जागेत २२८ घरे या योजनेतून बांधण्यात येणार आहेत. यातील नालेगाव येथील घरकुलांच्या पहिल्या इमारतीचा स्लॅब आज शिंदे यांच्या टाकण्यात आला. आमदार अनिल राठोड, नगरसेवक संभाजी कदम, गणेश कवडे, संजय शेंडगे, माजी नगरसेवक अनिल शिंदे, शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी, प्रकल्प अभियंता आर. जी. मेहेत्रे आदी या वेळी उपस्थित होते.
नालेगाव येथील घरकुलांचे बांधकाम पायापर्यंत आले असून काही इमारतींचे कॉलमही घेण्यात आले आहेत. या इमारतीच्या स्लॅबला आज सुरुवात करण्यात आली. येथील सँपल फ्लॅटचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना राठोड यांनी केली. त्यानुसार येत्या दीड महिन्यात सँपल फ्लॅट तयार करण्याची तयारी शहर अभियंता कुलकर्णी यांनी दर्शवली.     

Story img Loader