नालासोपारा पूर्वेला असलेली आणि वसईच्या हद्दीत येणारी संतोष भुवन परिसरातील वस्ती आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या बिलावरही ‘छोटा पाकिस्तान’ या नावाने ओळखली जाऊ लागली आहे. या परिसरातील लोक या भागाला ‘छोटा पाकिस्तान’ असे म्हणत असले, तरी राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या किमयेने ‘छोटा पाकिस्तान’ या नावाला एकप्रकारे सरकारी मान्यता मिळाल्यासारखे झाले आहे. मात्र वसई-विरार महापालिकेत या गोष्टीची दखल गंभीरपणे घेतली गेल्यानंतर महावितरणने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून पंधरा दिवसांत अहवाल मागविला आहे.
वसईच्या हद्दीत येणारा नालासोपारा पूर्वेकडील काही भाग हा छोटा पाकिस्तान म्हणून स्थानिकांमध्ये ओळखला जातो. संतोष भुवन परिसरातील हा संपूर्ण भाग अनधिकृत बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या भागातील रहिवाशांना महावितरणने दिलेल्या वीजबिलांवरही या भागाचा पत्ता ‘छोटा पाकिस्तान’ असा छापून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे वसई-विरार महापालिकेच्या सभेत एका नगरसेविकेने हे वृत्त उघडकीस आणल्यानंतर तेथेही या गोष्टीचा निषेध नोंदवला गेला. ही गोष्ट प्रकाशात आल्यानंतर महावितरणने ताबडतोब कठोर पावले उचलली आहेत. वीजबिलावर सदर भागाचा उल्लेख ‘छोटा पाकिस्तान’ असा कसा करण्यात आला, याबाबत महावितरणने चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी करा आणि पुढील १५ दिवसांत आपला अहवाल सादर करा, असे आदेश महावितरणच्या व्यवस्थापनाने संबंधित भागाच्या अधीक्षक अभियंता दिनेश साबू यांना दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा