दररोज लाखोंच्या संख्येने रिक्षा प्रवास करणाऱ्या ठाणेकरांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ठाणे शहरातील रिक्षांमध्ये ‘स्मार्ट ओळखपत्र’ बसविण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या ओळखपत्रात ‘सुरक्षा कोड’ देण्यात आला आहे. प्रवाशांनी मोबाइलमध्ये ‘सेफ जर्नी’ नावाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे आणि त्याआधारे हा सुरक्षा कोड स्कॅन करताच काही क्षणातच त्यांना रिक्षाचालकाची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. प्रत्येक रिक्षात चालकाच्या आसनामागे ‘स्मार्ट ओळखपत्र’ छापील स्वरूपात असेल. त्यावर मोबाइल धरताच हा सुरक्षा कोड स्कॅन होईल. या ओळखपत्राचे छायाचित्रही प्रवाशांना काढता येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे, असा दावा ठाणे वाहतूक पोलिसांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला. महिनाभरापूर्वी रिक्षातून पडून गंभीर जायबंदी झालेल्या स्वप्नाली लाड प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा