ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आता एसएसएस सेवाही सुरू करण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यालयाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी ही माहिती दिली. ९९२३५९९२३४ या क्रमांकावर एसएमएस पाठवून नागरिकांना या आंदोलनात सहभागी होता येईल असे त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचा प्रचार, प्रसार तसेच सक्षम जनलोकपालासंदर्भात जनजागृती व लोकपाल विधेयकास विरोध करणाऱ्या खासदारांविरोधातील देशव्यापी दौऱ्यास हजारे यांनी नुकतीच पाटण्याहून प्रारंभ केला. याच सभेत त्यांनी एसएमएसद्वारे आंदोलनात सहभागी होण्याचे अवाहन केले होते. पहिल्याच दिवशी एक हजार लोकांचा या अवाहनास प्रतिसाद लाभला. त्यानंतरही हा प्रतिसाद वाढत असल्याचे आवारी यांनी सांगितले. या सुविधेअंतर्गत सहभागी होऊ इच्छिनाऱ्या नागरिकांनी आपले नाव पत्ता व ई-मेल आयडी व एसएमएसद्वारे माहिती कळवल्यास त्यांना उत्तरादाखल आंदोलनाची माहिती दिली जाईल, त्यांच्या सहभागाचीही दखल घेतली जाईल.
या नागरिकांचे अर्ज ऑनलाईन पद्घतीने भरून घेतल्यानंतर ते या आंदोलनाचे कार्यकर्ते म्हणून काम पाहू शकतील. आंदोलनाच्या नव्या कार्यालयात देशभरातील नागरीकांच्या पत्रांचा ओघ सुरूच असून या लोकांशीही संपर्क करण्यात येत आहे. तेथील अत्याधुनिक यंत्रणेमुळे संपर्क केलेल्या नागरिकांशी तातडीने संपर्क करणे सुलभ झाल्याचे आवारी यांनी सांगितले.
दरम्यान पाटणा येथील सभेनंतर अण्णा शुक्रवारी रात्री राळेगणसिद्घीत परतले असून शनिवारी दिवभर त्यांनी आराम करणेच पसंत केले. रविवारी सकाळीच कार्यालयात जावून त्यांनी कामकाजाची माहिती घेतली तसेच लिखाणही केले. आगामी काळातील देशव्यापी दौऱ्यासंदर्भातील नियोजनाचाही त्यांनी आढावा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा