महाराष्ट्र सीमेलगत मध्यप्रदेशला जोडला गेलेल्या वैनगंगा नदी काठावरील बोंडराणी-अर्जुनी येथे गेल्या तीन महिन्यांपासून मोहफुलांपासून दारू साठवण्याचे मोठे कारखाने असून यासाठी लागणारे मोहफुल मध्यप्रदेशातील गावांमधून भरदिवसा सायकल, मोटारसायकल व अन्य वाहनांमध्ये या तपासणी नाक्यावरून आणले जाते; परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत.
या विभागाने तपासणी नाका उभारला आहे, पण तो फक्त शोभेची वस्तू असल्याचे चित्र उघडकीस येत आहे. या विभागाकडून आरोपींना अभयदान दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
परप्रांतातून येणाऱ्या देशी-विदेशी दारू व अन्य प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने विविध ठिकाणी असे तपासणी नाके उभारले आहेत. महाराष्ट्र सीमेलगत मध्यप्रदेशाची सीमा लागून आहे. या सीमेवर मोहफुलांपासून दारू साठवण्याचे मोठे कारखाने असून यासाठी लागणारे मोहफुल मध्यप्रदेशातील गावातून भरदिवसा सायकल, मोटारसायकल व अन्य वाहनांमधून या तपासणी नाक्यावरून आणले जाते; परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. एवढेच नव्हे, तर देशी-विदेशी दारू मध्यप्रदेशात स्वस्त असल्याने कमी दरात येणारी विदेशी दारू भरदिवसा पोलिसांच्या देखत येत असते.
तीन महिन्यांचा कालावधी संपून सुद्धा तपासणी नाक्यावर असा प्रकार घडला नाही की अधिकाऱ्यांनी मोहफुल किंवा विदेशी दारू जप्त केली असेल. या मोहफुल आणणाऱ्यांवर व दारू काढणाऱ्यांवर कसल्याच प्रकारची कारवाई होत नसून या विभागाच्या कर्मचाऱ्यांचे असे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना अभय असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
गोंदियात मध्यप्रदेशातून देशी-विदेशी दारूची तस्करी
महाराष्ट्र सीमेलगत मध्यप्रदेशला जोडला गेलेल्या वैनगंगा नदी काठावरील बोंडराणी-अर्जुनी येथे गेल्या तीन महिन्यांपासून मोहफुलांपासून दारू साठवण्याचे मोठे कारखाने असून यासाठी लागणारे मोहफुल मध्यप्रदेशातील गावांमधून भरदिवसा सायकल,
आणखी वाचा
First published on: 13-03-2013 at 02:41 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smuggling of domastic international alcohol in goindiya from mp