इचलकरंजी येथे नातवाला दवाखान्यात दाखविण्यासाठी आलेल्या आजीच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी धूम स्टाईलने लंपास केले. दुपारी ही घटना घडली. याबाबतची नोंद गावभाग पोलिसात झाली असून शशिकला आप्पासाहेब चौगुले (वय ४८ रा. नरंदे) यांनी फिर्याद दिली आहे.
शशिकला चौगुले या आपली मुलगी अमृता (वय २७), पती आप्पासाहेब यांच्यासह श्रीपादनगरातील डॉ. वनारसे यांच्या दवाखान्यात नातू रितेश याला दाखविण्यासाठी आल्या होत्या. दवाखान्यात डॉक्टर नसल्याने त्या बाहेर आल्या. त्याचवेळी त्यांच्यासमोरून मोटरसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी मागे बसलेल्या तरुणाने चौगुले यांच्या गळ्यातील साडेचार तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून मोटरसायकलवरून धूम ठोकली. चौगुले यांनी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पोलीस दप्तरी ऐवजाची किंमत ९० हजार रुपये नोंद करण्यात आली असली तरी बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत दीड लाखाच्या आसपास होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा