समाजकारणाला राजकारणाची जोड हवी, त्याशिवाय प्रश्नांची सोडवणूक करता येणार नाही, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य टाकरे यांनी शनिवारी येथे केले.
शिवसेना, तसेच सूर्योदय परिवाराच्या वतीने स. भु. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत २४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. नोकरी मिळवतानाच समाजासाठी काय करता येईल, याचा विचार करून देशाला तुमचा वेळ द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केले. राष्ट्रसंत भय्यूजीमहाराज या वेळी उपस्थित होते. मातृशक्ती महान असून स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी वंशवादाची मानसिकता संपवून, स्त्रियांना समानतेचा अधिकार व चांगली वागणूक दिली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. भय्यूजीमहाराज, ठाकरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. खासदार चंद्रकांत खैरे, मनीष अवस्थी, दिनेश गंगापूरवाला आदींची या वेळी उपस्थिती होती. संविधान जनजागरण अभियानांतर्गत वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले. किशनचंद तनवाणी, सुहास दाशरथे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, नंदकुमार घोडेले, राजेंद्र राठोड, राजू वैद्य आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा