हिवरे गावाला शंभर टक्के शुद्ध आणि स्वच्छ पाणी, हवा उपलब्ध आहे. तेथील पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षा कैक पट अधिक चांगले आहे. मुलींचा जनन दर तेथे सर्वाधिक आहे. गावामध्ये एकही पुतळा नाही, शाळेतील मुले आणि गावकरी मिळून गावाची स्वच्छता करतात. प्रत्येक ग्रामस्थांच्या घरासमोर पाच फळांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. मुलांसाठी खास बचत बँक गावात आहे. अशा या परिपूर्ण गावाचे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनेसुद्धा कौतुक केले आहे. त्यामुळे ‘हिरवे गावाला नक्की या’ असे आमंत्रण सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी ठाणेकरांना दिले.
जेष्ठ समाजसेवक पोपटराव पवार यांनी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफले. त्यांनी यावेळी हिवरे गावाच्या वैशिष्टय़ांची उकल श्रोत्यांसमोर केली. या गावामध्ये कुटुंबात जन्माला आलेल्या पहिल्या मुलीचा सन्मान केला जातो. दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास त्या मुलीचे लग्न गावाकडून केले जाते. नक्षत्र व राशीवर आधारित उद्याने गावात आहेत. सकस आहार गावात मिळतो. सेंद्रिय खताची शेती गावात आहे. त्यामुळेच आनंददाई आणि आदर्श गावाची प्रगती पाहण्यासाठी जगातील लोकांची येथे गर्दी होते. हिवरे गावाच्या धर्तीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गाव दत्तक’ योजना आयोजित केल्याचे पवारांनी स्पष्ट केले. त्यांच्या या यशस्वी वाटचालीला ठाणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात सलाम केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा