सामाजिक बांधिलकीची जाणीव असेल, तर केलेल्या कार्याची दखल समाजाकडून घेतली जाते. समाजमान्यतेच्या प्रेरणेतून मिळालेले पुरस्कार आणखी बळ देतात असा विश्वास व्यक्त करताना, समाजातील तळागळातील वंचित घटकांसाठी झटा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा, सध्याच्या समाजव्यवस्थेला खऱ्या अर्थाने ‘यशवंत’ विचारांची गरज असल्याचे पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजचे प्रा. डॉ. गिरीश पठाडे यांनी सांगितले.
मलकापूर (ता. कराड) येथील माउली ज्ञान प्रबोधिनीतर्फे कृष्णाकाठच्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील एन.डी.ए. चे उपप्राचार्य प्रा. डॉ. अशोकराव देवीकर, स्थानिक निधी लेखापरीक्षक काकासाहेब विधाते, नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, माउली कुटुंबप्रमुख अण्णासाहेब पाटील, कार्यक्रमाचे निमंत्रक गं्रथमित्र प्रा. हणमंत कराळे यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. रा. गो. प्रभुणे यांना विशेष ‘कृष्णाकाठ भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचाही सन्मान करण्यात आला. कृष्णाकाठच्या कर्तृत्ववान महिलांमध्ये पुण्याचे जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या मातोश्री कोंडाबाई दळवी, विमल राजेघाटगे, उषा चोपडे, कुसुम पवार, सुरेखा पालकर, जनाबाई साळोखे, द्रौपदाबाई कांबळे, विमल कारंडे, मंजुळा भोसले, विमल जगताप यांना सन्मानित करण्यात आले.
यंदाच्या यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी पुरस्काराने बिटले (ता. मोहोळ) येथील आदर्श सरपंच व पंचायत समिती सदस्या संजीवनी पाटील, विक्रम भोसले, जयश्री रजपूत, प्रा. दत्तात्रय कदम, अ‍ॅड. सुनीता घाडगे-मोरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाती सहायक दुय्यम निरीक्षक शंकरराव कांबळे (कोर्टी, ता. कराड), प्राचार्य काळे, प्रा. शिवाजीराव कदम, एम. एल. पाटील, अशोकराव पाटील-आणेकर, आनंदराव शेवाळे, डॉ. उद्धवराव रसाळे, प्रमोद जगताप, अमृतराव वास्के, मनीषा पाटील यांना सन्मानित करण्यात आले.