मुंबई आणि परिसरात सध्या मोठय़ा प्रमाणावर जुन्या इमारती पाडून त्यांचा पुनर्विकास केला जात आहे. पुनर्विकासाचे फायदे आणि गरज, त्याविषयीचे सहकार कायदे त्यात झालेले बदल, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुकीसाठीचे नियम याबाबत चांगली माहिती मिळण्याची आजघडीलाोसर्वानाच खूप गरज आहे म्हणून महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन आणि विलेपार्ले विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पार्लेश्वर हॉल, शहाजीराजे मार्ग, सनसिटी सिनेमागृहाजवळ, विलेपार्ले  पूर्व येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे माजी सचिव एस. व्ही. कुलकर्णी, के  पूर्व वॉर्डाचे उपनिबंधक, पुनर्विकासक  पी. एल.देसाई पीसीआयचे वरिष्ठ व्यवस्थापक रमेश शानभाग, आरकेबी शोचे राजीव बजाज, असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू आदी सहभागी होणार आहेत. जिल्हा उपनिबंधक सुभाष पाटील आणि आमदार कृष्णा हेगडे या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहणार आहेत. गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी व उपाययोजना, व्यवस्थापन सल्लागारांची भूमिका याविषयांवरही चर्चासत्रातील सहभागी वक्ते बोलणार आहेत, अशी माहिती पत्रकात दिली आहे. अधिक माहितीसाठी ०२२२६२४८५८९ या क्रमांकावर संपर्क  साधावा.

Story img Loader