महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराच्या वतीने यंदा अंगारकीनिमित्त शास्त्रोक्त पध्दतीने अष्टविनायक दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय काशी-गंगासागर-पशुपतिनाथासह गया दर्शन सहलीचेही आयोजन करण्यात आले आहे.
तीन दिवसांची अष्टविनायक दर्शनसहल येत्या ३१ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता निघणार आहे. मोरगाव, थेऊर, सिध्दटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड व पाली या अष्टविनायकासह देहू, उनेरे (गरम पाण्याचे कुंड), केतकावळे (बालाजी मंदिर) भीमाशंकर आदी धार्मिक व पर्यटनस्थळांचा या सहलीत समावेश आहे. या सहलीसाठी २४०० रुपये शुल्क आहे.
काशी, गंगासागर,पशुपतिनाथासह गया दर्शन सहल येत्या ५ जानेवारी रोजी निघणार आहे. १७ दिवसांच्या या सहलीसाठी १२००१ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यात विजयवाडा, अनावरण, विशाखापट्टणम, पिठापुराम्, जगन्नाथपुरी, कोणार्क, भुवनेश्वर, कोलकाता, गंगासागर, गया, बुध्दगया, काशी, गोरखपूर, चित्रकुट, माहूरमार्गे ही सहल सोलापूरला परत येणार आहे. या सहलींसाठी इच्छुकांनी पाचशे रुपये भरून नावनोंदणी करावी. त्यासाठी प्रभाकर माशाळे (मोबाइल-९८५०८८२१२०) किंवा ताराचंद राठोड (९९६०७३६७३२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक विवेक हिप्पळगावकर यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा