ऊर्जा ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज असताना वातावरणातील बदलाचे भान ठेवून पारंपरिक ऊर्जेऐवजी अपारंपरिक ऊर्जा स्रोताकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. मोठमोठी हॉटेल्स, शासकीय-निमशासकीय कार्यालये, ग्रामीण भागात पथदिवे यासाठी सौरऊर्जा वापरली जात आहे. त्यापलीकडे जाऊन शहरातील जुनी मिल आवारातील उमा नगरीत राहणारे श्रीनाथ इंडे यांनी आपल्या घरगुती विजेसाठी सौरऊर्जेजा वापर सुरू केला आहे.
एच. एस. रिन्युएबल एनर्जीने इंडे यांच्या घरात सौरऊर्जेद्वारे वीज उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून त्यांच्या घरातील दोन पंखे, चार सीएफएल, एक टीव्ही, एक फ्रिज, १.५ के. व्ही. ओव्हन, मिक्सर इत्यादी उपकरणे चालतात. या सौरऊर्जा पध्दतीच्या उभारणीचा खर्च प्रारंभी मोठा वाटत असला तरी उपयोगिता आयुष्य लक्षात घेता, प्रत्येकाला परवडणारे आहे. याबाबतची माहिती एच. एस. रिन्युएबल एनर्जीचे प्रतिनिधी ए. जे. महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या विजेची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत असल्याने वीजटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. कारखानदार, उद्योजक, व्यावसायिकांसह सामान्यजनांना भारनियमनाची झळ पोहोचत आहे. त्यासाठी आता अपारंपरिक ऊर्जा हाच पर्याय म्हणून समोर येत आहे. सौरऊर्जेमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. सर्वसाधारणपणे सौरऊर्जेवर पाणी तापविणे एवढय़ावरच न थांबता पथदिवे, कृषिपंप व पेट्रोलपंपांसाठी सौरऊर्जा वापराकडे कल वाढत आहे. आता त्यापलीकडे जाऊन घरगुती वीज वापरासाठी सौरऊर्जेचा उपयोग केला जात असल्याचे महाजन यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा