गोदावरीतील जलप्रदूषणामुळे उच्च न्यायालयाने कुंभ पर्वणी काळात बाहेरून येणाऱ्या भाविकांनी गोदेत स्नान का करावे, अशी विचारणा केल्यानंतर महापालिकेसह जिल्हा प्रशासनही जागे झाले. त्यानंतर हे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येऊ लागल्या असून मंगळवारी विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर संबंधित अधिकारी आणि गोदावरी गटारीकरणविरोधी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी शहर परिसरातील नाल्यांची संयुक्तपणे पाहणी केली. बऱ्याच ठिकाणी गोदावरीला येऊन मिळणारे नाले वळविण्यात आले असले तरी वाढत्या जल प्रदूषणामुळे कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी मंचने केली आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मंचने काही उपायही सुचविले आहेत.

गोदा प्रदूषणाबाबत मंचने मागील महिन्यात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. गोदा प्रदूषणाची सद्यस्थिती पाहता भाविकांनी गोदेत स्नान का करावे, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. त्याची दखल घेत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिलेल्या आदेशानुसार विभागीय उपायुक्त प्रकाश वाघमारे, महापालिकेचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रवी आंधळे यांच्यासह मंचचे निशिकांत पगारे आणि सहकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी गंगापूर रोडवरील बारदान फाटय़ाजवळील नाल्यापासून पाहणीस सुरुवात केली. गंगापूर गावापासून होळकर पुलापर्यंत काठाच्या उजव्या बाजूने गोदावरी नदीस मल्हारखान नाला, जोशीवाडा, देह मंदिर सोसायटी आणि चव्हाण कॉलनी परिसरातील नाला, सुयोजित गार्डनमागील नाला, आनंदवली नाला, चिखली नाला, सोमेश्वर नाला, गंगापूरगाव नाला तसेच पंचवटी भागातील गांधारवाडी होळकर पुलापासून डाव्या काठाने गांधारवाडी, कुसुमाग्रज उद्यानालगत, रामवाडी तसेच होळकर पुलापासून ते तपोवनपर्यंत काठाच्या उजव्या बाजूने सरस्वती नाला, नागझरी नाला, नासर्डी नदी आणि डाव्या बाजूने वाघाडी, अरुणा, कपिला या नैसर्गिक नाल्यांची पाहणी करण्यात आली.
पाहणीत बहुतांश नाले हे मलनिस्सारण केंद्राच्या मुख्य वाहिनीत वळविण्यात आले तर काही ठिकाणी ते अद्याप खुले आहेत. काही ठिकाणी यामुळे चिखल तयार झाला असून दलदलीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने पानवेलीसह अन्य वनस्पतींची वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर मंचच्या पदाधिकाऱ्यांनी कामकाजाविषयी असमाधान व्यक्त केले असून कायमस्वरूपी ही व्यवस्था असावी अशी मागणी केली आहे. नाले वळवित असताना निरीने केलेल्या सूचनेप्रमाणे पर्यायाचा अवलंब करण्यात यावा. ज्या ठिकाणी चिखल किंवा मातीत ओल आहे त्या ठिकाणी अळूसारख्या वनस्पतीची लागवड करावी. जेणेकरून प्रदूषित पाणी शोषले जाईल, बायो ऑक्साइड डिव्हाइड(बीओडी)ची पातळी कमी होण्यास मदत होईल, असे पगारे यांनी नमूद केले आहे.

Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
Mahabaleshwar Revenue takes strict action against unlicensed mining satara news
विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूलची धडक कारवाई
Unauthorized construction CIDCO proposal for Navi Mumbai
अनधिकृत बांधकामांना दंडाची पळवाट!  नवी मुंबईसाठी ‘सिडको’चा प्रस्ताव; सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोधदंड आकारणी कशी असेल?
Will water supply in Wardha remain shut indefinitely
वर्ध्यात पाण्यासाठी हाहा:कार! पाणीपुरवठा बेमुदत बंद राहणार ?
Vasai Virar Municipal corporaton , Water Supply Vasai Virar, Water Team Vasai Virar ,
वसई : पालिकेचे पाणी पथक स्थापन, आमदारांनी खडसावताच पालिका सक्रिय
Story img Loader