ज्योती एंटरटेनमेंट या संस्थेतर्फे अभिनेत्री ज्योती डोगरा यांचा ‘सोलो डान्स’ हा कार्यक्रम उद्या, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता उत्तर अंबाझरी मार्गावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सेनाड असोसिएटसचे संचालक अॅड. रमण सेनाड उपस्थित राहणार आहेत. ज्योती डोगरा यांनी ‘नोट्स ऑन चाय’ नावाचा ‘सोलो शो’ तयार केला आहे. या कार्यक्रमात रंगबेरंगी दिव्याच्या प्रकाश झोताशिवाय त्या दुसऱ्या कुठल्याही तांत्रिक बाबींचा आधार घेत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमामध्ये त्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतील गीतांवर नृत्य करतात. यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या चार भूमिका प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. डोगरा यांचा नागपुरातील हा पहिलाच कार्यक्रम असल्याची माहिती ज्योती एंटरटेनमेंटचे संचालक निखिल लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ज्योती एंटरटेनमेंट ही संस्था विदर्भातील कलाकारांना आपली कला सादर करण्यास वाव देणार आहे. विदर्भात कलेला उत्तेजन मिळावे, यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. यावेळी अतुल शेबे, मिथुन हटवार उपस्थित होते.
अभिनेत्री ज्योती डोगरा यांचा आज ‘सोलो डान्स’ कार्यक्रम
ज्योती एंटरटेनमेंट या संस्थेतर्फे अभिनेत्री ज्योती डोगरा यांचा ‘सोलो डान्स’ हा कार्यक्रम उद्या, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता उत्तर अंबाझरी मार्गावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
First published on: 09-05-2014 at 08:53 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solo performance of actress jyoti dogra