कोल्हापूरकरांनी टोलराजविरूध्द तीव्र आंदोलन करून संतप्त भावना व्यक्त केल्याच्या पाश्र्वभूमीवर याप्रश्नी समन्वय व चर्चेतून तोडगा निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गृहराज्यमंत्री तथा सातारा जिल्हयाचे संपर्कमंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील उपस्थित होते.
बोधगया धर्मस्थळावर झालेल्या हल्ल्याच्या ताज्या घटनेनंतर आषाढी वारी व पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने संरक्षणाची दक्षता घेतली आहे का? या प्रश्नावर बोधगया या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी व निश्चितच निंदनीय असून, केंद्र सरकार या प्रकाराचा छडा लावेल. हल्लेखोरांना शासन होईल. राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळासाठी संरक्षणाची व्यवस्था केली आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांनी व आषाढी एकादशीला भाविकांनी निश्चिंत रहावे. असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा