कल्याण-डोंबिवली पालिकेची मालमत्ता कराची बनावट कर पावती तयार करून पालिकेचे आर्थिक नुकसान व मूळ मालकाची फसवणूक करणाऱ्या जुनी डोंबिवलीतील यशवंतनगरमध्ये राहणाऱ्या दिलीप देवकर (वय ४८), मुलगा अनिकेत (वय १८) यांना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.
दिलीप देवकर हे मुंबईत गटई कामगार आहेत. घरमालक चंद्रकांत माने व पत्नी पुष्पा यांच्या नावे ११ हजार ५०० रुपयांचा मालमत्ता कर पालिकेत भरणा करायचा होता. माने कुटुंबाने देवकर यांना कराची रक्कम देऊन ती पालिकेच्या ‘ह’ प्रभागात भरण्यास सांगितले. अनिकेतने संगणकावर पालिकेच्या पावतीची नक्कल तयार करून त्यावर फेरबदल करून ती पावती पालिकेत भरणा करण्याचा प्रयत्न केला. पालिका कर्मचारी जगदिश गायकवाड यांना त्या पावतीचा संशय आला. माने यांना पैसे भरल्याची देवकर यांच्याकडून मिळालेली पावती पाहून संशय आला. त्यांनी पालिकेत येऊन खातरजमा केली असता त्यांना मूळ मालकाच्या जागी वेगळेच नाव असल्याचे दिसले. बनावट पावती तयार केल्याबद्दल विष्णूनगर पोलीस ठाण्याने वडील, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा