शिर्डीकरांना लवकरच मीटरने, १ पैसा प्रतिलीटर दराने २४ तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती, कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
शिर्डीमधील विविध विकासकामांचे उद्घाटन व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा शुभारंभ, कार्ड वाटप, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य धनादेशाचे वाटप तसेच ई-सेवा सेतूचे उद्घाटनमंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. नगराध्यक्ष सुमित्राताई कोते, उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, पं.स.चे सभापती श्रीनिवास त्रिभुवन, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, राजीव गांधी जीवनदायी योजनेतून शिर्डी शहरातील साडेतीन हजार लोकांना फायदा होणार आहे. शिर्डीत ३५० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. शिर्डी हे झोपडपट्टीमुक्त करण्याचे हे पहिले पाऊल आहे. नगरपंचायतीच्या हद्दीतील ११२ घरकुलांचे काम पूर्णत्वास आले आहे. ३ कोटी ५३ लाख रु. किमतीच्या विविध विकासकामांच्या माध्यमातून शिर्डीकरांचे प्रश्न सुटणार आहेत. शिर्डीसाठी १०० कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली असून, साईभक्तांना व शिर्डीकरांना सोयीसुविधा देण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करणार आहोत.
या वेळी माजी नगराध्यक्ष कोते यांचे भाषण झाले. प्रास्ताविक नगराध्यक्ष सुमित्रा कोते यांनी केले, तर आभार नगरसेविका अनिता जगताप यांनी मानले.
शिर्डीमध्ये लवकरच मीटरने २४ तास पाणीपुरवठा-विखे
शिर्डीकरांना लवकरच मीटरने, १ पैसा प्रतिलीटर दराने २४ तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती, कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-01-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soon 24 hour water supply by meter to shirdi vikhe