जिल्हा बुद्धिबळ संघटनेस जागा उपलब्ध करून देऊन त्याच ठिकाणी ‘महापौर बुद्धिबळ चषक स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा महापौर शीला शिंदे यांनी आज दुस-या ‘जैन इंटरनॅशनल फिडे रेटिंग स्पर्धेच्या उद् घाटनप्रसंगी आज केली.
जैन इंरिगेशन सिस्टिम व डीएलबी ट्रस्ट आयोजित बुद्धिबळ स्पर्धेस आजपासून कोर्टगल्लीतील सुयोग मंगल कार्यालयात सुरुवात झाली. स्पर्धा दि. २५पर्यंत चालतील. स्पर्धेत राज्यातील २०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. सौरभ खेडेकर (नागपूर), अतुल डहाळे (पुणे), हेमंत मांढरे (सातारा), अमित तारे (नाशिक), प्रतीक मुळे (पुणे), अमरीश जोशी (पुणे) यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवला. सुयोग वाघ, सत्यम वरुडे, ओंकार बापट, देवेंद्र ढोकळे, ओंकार केदार, संकर्ष शेळके आदी नगरच्या मानांकित खेळाडूंचा समावेश आहे. पंच म्हणून प्रवीण ठाकरे, प्रेम पंडित, श्रावण निळकंठ, अमरीश जोशी आदी काम पाहात आहेत.
स्पर्धेची सुरुवात सकाळी महापौर शिंदे व आमदार अनिल राठोड यांच्या हस्ते पटावरील चाल करून करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष यशवंत बापट यांनी केले. सूत्रसंचालन पारूनाथ ढोकळे यांनी केले. सुबोध ठोंबरे यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा