स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत उद्या (मंगळवारी) दुपारी १ वाजता सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हय़ात उसाचे क्षेत्र घटल्यामुळे ७० टक्के खरिपाची पेरणी सोयाबीनची होते आहे. या वर्षी सोयाबीन काढणीला येण्यापूर्वीच १ हजार रुपयांनी भाव गडगडले आहेत. सरकारने सोयाबीनला २ हजार ५६० रुपये हमीभाव जाहीर केला. वाढती महागाई व उत्पादनखर्च पाहता एकरी सरासरी उत्पन्नाच्या १३ हजार रुपये शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. सोयाबीनला क्विंटलमागे किमान ५ हजार रुपये भाव मिळावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने परिषदेत करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सत्तार पटेल व राजेंद्र मोरे यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा