कोरडवाहू शेती, पावसाची अनिश्चितता, शेतीचा मोठा खर्च करून घरप्रपंचात लागणारी मोड कशी करायची, हे आव्हान स्वीकारत औसा तालुक्यातील आशीव येथील शेतकरी प्रवीण प्रकाशराव कुलकर्णी यांनी कोरडवाहू नैसर्गिक शेतीतून सोयाबीन व तूर पिकांचे यशस्वी उत्पादन घेतले. या पिकांमधून एकरी एक लाखाचे उत्पन्न यशस्वीपणे मिळवले.
निसर्गावर अवलंबून कोरडवाहू शेती करणे आज बेभरवशाचे होत आहे. कधी पाऊस जास्त तर कधी पाऊस कमी, पिकाला पोषक पाऊस झाला तरी संकट कायम, त्यामुळे नैसर्गिक शेतीतून हमखास उत्पन्न मिळतेच असे नाही. त्यामुळे दरवर्षी नुकसानीत सापडून कराच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी निराशेपोटी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग पत्करतात, हे आजचे वास्तव आहे.
या पाश्र्वभूमीवर नैसर्गिक शेतीतून शेतकरी प्रवीण कुलकर्णी यांनी एकरी १ लाख या प्रमाणे १२ एकर शेतीतून यशस्वी उत्पन्न मिळविले. शेतकऱ्यांसाठी हे अनुकरणीय उदाहरण ठरावे.
सन २०१२-१३ या हंगामात तूर पिकासाठी १२ एकर क्षेत्र निवडले. यासाठी रासायनिक खतांचा वापर न करता ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राने चार काकरी सोयाबीन व एक काकरी तुरीची पेरणी केली. महाबीज कंपनीच्या जेएस ३३५ सोयाबीन, तूर ७३६ या वाणांची निवड केली. पेरणीनंतर २१व्या दिवशी कीटकनाशक व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी, तर ४५व्या दिवशी दुसरी फवारणी केली. या काळात आंतरमशागतीच्या दोन पाळ्या घेतल्या. योग्य वेळी योग्य मशागतीमुळे परणी, आंतर मशागतीसाठी लागणाऱ्या खर्चाची बचत झाली. सोयाबीनचे एकरी १७ क्विंटल व सात बॅगचे ११९ क्विंटल ५० किलो उत्पादन मिळाले. महाबीज कंपनीचे फौंडेशन बियाणे घेतले. चांगल्या उत्पादनामुळे बाजारभावापेक्षा २५ टक्के भाव जास्त मिळणार असून बाजारभावापेक्षा १ लाखाहून अधिक पैसे मिळणार आहेत.   

Story img Loader