‘कुसुमताई चित्ते व्यसनमुक्ती प्रतिष्ठान’तर्फे एका दिवसभराच्या कालावधीत समुपदेशन, मार्गदर्शन याद्वारे अमली पदार्थ, मद्यपान तसेच धूम्रपान व तंबाखूसेवनाच्या व्यसनापासून मुक्ती मिळवून दिली जाते. या प्रतिष्ठानतर्फे नरेंद्र चित्ते सातत्याने कार्यरत आहेत.  
बुधवार, २६ जून रोजी जागतिक अमली पदार्थविरोधी दिन असून त्यानिमित्त व्यसनमुक्तीविषयक मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.    प्रतिष्ठानतर्फे व्यसनमुक्तीविषयक विशेष कार्यक्रमाचे आयोजन माटुंगा येथील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेच्या सभागृहात सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी तसेच व्यसनमुक्तीविषयक माहितीसाठी ९६१९२०७९९९ अथवा ८४४६१८४८९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे नरेंद्र चित्ते यांनी पत्रकाद्वारे केले आहे.