मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागावर प्रवाशांची वाढलेली गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने नांदेड-पुणे-नांदेड विशेष रेल्वेगाडी धावणार आहे. तसेच शिर्डी साईनगर-हजरत निझामउद्दीन साप्ताहिक विशेष गाडीचीही सोय करण्यात आली आहे.
नांदेड-पुणे (क्र. ०७६३१) ही विशेष गाडी २२ मे रोजी सकाळी ६.१५ वाजता नांदेड स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी पूर्णा, परभणी, परळी, लातूर, कुर्डूवाडी, दौंडमार्गे पुण्यात रात्री आठ वाजता पोहोचणार आहे. तर त्याच दिवशी (२२ मे) पुणे-नांदेड विशेष गाडी (क्र. ०७६३२) रात्री ९.०५ वाजता पुण्यातून सुटून ती नांदेडला दुसऱ्या दिवशी दुपारी १.२० वाजता नादेडला पोहोचणार आहे.
दरम्यान, नांदेड-पुण-नांदेड विशेष गाडी येत्या १५ व २९ मे रोजी मनमाडमार्गे धावणार आहे. याशिवाय साईनगर शिर्डी-हजरत निझामउद्दीन विशेष गाडीचीही सोय २९ जूनपर्यंत ही रेल्वेसेवा चालणार आहे.

Story img Loader