उन्हाळ्याच्या सुटीतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे लोकमान्य टिळक टर्मिनस- शालिमार या मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीत विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी धावणार आहे.
०८०६० शालिमार- एलटीटी (कुर्ला) ही गाडी ३ एप्रिल ते २६ जून या कालावधीत दर बुधवारी सकाळी ६ वाजता शालिमार स्थानकावरून सुटेल. ही गाडी बुधवार- गुरुवारच्या मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांनी नागपूरला येईल आणि १२.२५ वाजता कुल्र्यासाठी रवाना होईल. ही गाडी एप्रिल महिन्यात ३, १०, १७ व २४, मे महिन्यात १, ८, १५, २२ व २९ आणि जून महिन्यात ५, १२, १९ व २६ या तारखांना शालिमार स्थानकावरून सुटेल.
०८०५९ एलटीटी (कुर्ला)- शालिमार ही गाडी ५ एप्रिल ते २८ जून या कालावधीत दर शुक्रवारी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी एलटीटी स्थानकावरून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी नागपूरला येईल आणि २ वाजता शालिमारसाठी रवाना होईल. ही गाडी एप्रिल महिन्यात ५, १२, १९ व २६, मे महिन्यात ३, १०, १७, २४ व ३१ आणि जून महिन्यात ७, १४, २१ व २८ या तारखांना कुर्ला स्थानकावरून सुटेल. एसी थ्री टियरचा एक, शयनयान श्रेणीचे ८, सामान्य अनारक्षित श्रेणीचे ६ आणि दोन एसएलआर अशा एकूण १७ डब्यांसह धावणाऱ्या या गाडीला प्रामुख्याने संतरागाछी, खडगपूर, टाटानगर, चक्रधरपूर, राऊरकेला, झारसुगडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, भुसावळ व कल्याण या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घ्यावा, अशी सूचना रेल्वे प्रशासनाने केली आहे.

Story img Loader