रेल्वे प्रशासनाने होळी व धुलिवंदन सणानिमित्त आठ मार्चपासून विशेष रेल्वेगाडय़ा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ांचा लाभ भुसावळहून मुंबई प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना होणार आहे.
विशेष रेल्वेगाडय़ा व त्यांची वेळ पुढीलप्रमाणे. मुंबई सीएसटी ते पटणा गाडी क्र. ०१०५३ सीएसटी येथून ८ व १५ मार्च रोजी. १४.०५ वाजता सुटेल. ही गाडी नाशिक १७.३५ वाजता, मनमाड १८.३०, जळगाव २०.२३, भुसावळ २०.५० याप्रमाणे पोहचेल. गाडी क्रमांक ०१०२७ सीएसटी मुंबई ते वाराणसी १२ व १९ मार्च रोजी मुंबई येथून ००.२० वाजता सुटेल. ही गाडी नाशिक ४.३५, जळगाव ७.१३, भुसावळ ७.४० तसेच परतीच्या प्रवासात क्रमाक ०१०२८ ही गाडी १३ व २० मार्च रोजी वाराणसीहून ८.०० वाजता सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता मुंबई येथे पोहचेल. भुसावळ २.५५, जळगाव ३.३०, नाशिक ५.४५ वाजता ही गाडी येईल. गाडी क्र. ०२११ लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ एक्स्प्रेस गाडी १४, २१, २८ मार्च रोजी ११.२० वाजता सुटेल. मनमाड १५.४८, भुसावळ १८.०० वाजता तर, परतीच्या प्रवासात क्रमांक ०२११२ ही गाडी १५, २२, २९ मार्च रोजी १४.४० वाजता लखनऊहून निघाल्यानंतर भुसावळ ८.१५, मनमाड १०.३० वाजता पोहचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते आग्रा केन्ट एक्स्प्रेस गाडी क्र. ०१०१७ १२ व १९ मार्च रोजी १४.२० वाजता निघाल्यानंतर नाशिक १७.३८, मनमाड १८.३५ जळगाव २०.१५ भुसावळ २०.५० वाजता येईल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०१०२८ आग्रा येथून १३ व २० मार्च रोजी १४.४५ वाजता सुटल्यानंतर भुसावळ ५.३०, जळगाव ६.२८, मनमाड ०९.०७, नाशिक १०.०५ वाजता पोहचेल. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन भुसावळ मंडळाचे वाणिज्य प्रबंदक व्ही. जी. नायर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा