सोलापूर-पुणे हिवाळी सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी चालू डिसेंबर महिन्यात प्रत्येक रविवारी, दि. ९, १६, २३ व ३० डिसेंबर रोजी धावणार आहे. याशिवाय चेन्नई सेंट्रल-पुणे-चेन्नई सेंट्रल साप्ताहिक गरीबरथ विशेष गाडी येत्या २७ डिसेंबपर्यंत धावणार आहे. त्यामुळे सोलापूर-पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास आणखी सुलभ व सोईचा झाला आहे.
सोलापूर-पुणे हिवाळी सुपरफास्ट विशेष गाडी (क्र. ०१०१३) चालू महिन्यात प्रत्येक रविवारी सकाळी ११.१० वाजता निघणार आहे. ही गाडी कुर्डूवाडी, जेऊर व दौंड येथे थांबे घेऊन दुपारी ३.१० वाजता पोहोचणार आहे. तर पुणे-सोलापूर सुपरफास्ट विशेष गाडी (क्र. ०१०१४) पुण्याहून दुपारी ४.१५ वाजता सुटून दौंड, जेऊर व कुर्डूवाडीमार्गे सोलापुरात रात्री ८.५५ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला १८ कोचेस जोडण्यात आले आहेत.
चेन्नई सेंट्रल-पुणे साप्ताहिक गरीबरथ विशेष गाडी (क्र. ०६०२८) येत्या २६ डिसेंबपर्यंत प्रत्येक बुधवारी चेन्नई येथून दुपारी ४ वाजता सुटणार असून ही गाडी वाडी, गुलबर्गामार्गे सोलापूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता पोचणार आहे. ही गाडी पाच मिनिटांचा थांबा घेऊन पुढे दौंडला थांबून दुपारी एक वाजता पुण्यात पोहोचणार आहे. तर, पुणे-चेन्नई सेंट्रल साप्ताहिक गरीबरथ विशेष गाडी (क्र. ०६०२७) पुणे येथून प्रत्येक गुरूवारी दुपारी २.१५ वाजता निघून दौंडमार्गे सोलापूरला सायंकाळी ७.१० वाजता पोहोचणार व १० मिनिटांचा थांबा घेत पुढे गुलबर्गा, वाडीमार्गे दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी सकाळी ११.३५ वाजता चेन्नई सेंट्रल स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला १६ कोचेस जोडण्यात आले आहेत.

Story img Loader